Renuka Devi Temple is situated on a hillock, amidst breathtakingly beautiful nature, at about 2 km from the village of Mahur, in Nanded District. The temple is dedicated to goddess Renuka, mother of Shree Parshuram.
There are also temples dedicated to Loed Dattatreya and Shree Parasuram.
The temple is believed to have been constructed by a Yadava king of Devgiri about eight to nine hundred years ago. A big fair is held annually on the Dussehra day in honour of Renuka Devi. The carved caves in the hills around Mahur are also worth visiting.
आम्ही सगळे जुलाई ७ व ८ तारखेला माहुरला गेलो होतो, रेणुका देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी, रेणुका देवी ही आमची कुलदैवत आहे म्हणजे आमच्या घराण्याचे दैवत, आम्ही ७ तारखेला सायकली ५ वाजता माहुर येथे पोहोचलो, मग आम्ही आमचे गुरूजी याच्याकडे गेलो व दुसरया दिवसाच्या पूजेची माहिती दिली.
८ तारखेला सकाळी ७ वाजता उठालो आणि जवळच "मातृतीर्थ" आहे म्हणजे एक तलाव आहे, तेथे अघोंळीला गेलो,
मग आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालो, माहुर ला ३ डोंगर एक आहे त्यात प्रथम एक डोंगरावर रेणुका देवी नंतर सती अनुसया देवी आणि नंतर श्री गुरुदेव दत्त याचे मन्दिर आहे, माहुर पासून ३ किमी वर देवीचे मन्दिर आहे, पण प्रथम आम्ही सटी अनुसया देवीच्या दर्शनासाठी गेलो, अनुसया देवी ही श्री दत्त याची आई आहे.
असुसाया देवीचे मन्दिर हे रेणुका देवीच्या मंदिर पासून १ किमी वर आहे, तेथे दर्शन घेउन मग आम्ही श्री गुरुदेव दत्त यांच्या दर्शाना साठी गेलो, हे मन्दिर १ किमीवर होते, तेथे गेल्यावर आम्ही प्रथम दर्शन घेतले व नंतर आही तिथून दिसणार्या रम्य निसर्गाचे दर्शन घेतले...
चोहिकडे जंगल होते आणि नीरव शांतता याचे साम्राज्य होते, येथून आपल्याला उरलेले दोन मंदिर दिसतात, मग आही रेणुका देवीच्या दर्शनासाठी निघालो, पोहोचल्या वर आम्ही पूजेचे साहित्य घेतले, त्यात ओटी,हिरवी साडी, हार, फूले घेतली, आणि महत्वाचे आम्ही देविसाठी ताम्बुल विडा घेतला. हा विडा आपण देवीला प्रसाद म्हणुन अर्पण करतो. मग आम्ही जवळ जवळ ३०० पायारया चढून मंदिरपाशी गेलो आणि मग आम्ही देवीची पूजा केलि, गुरूजीनि नैवद्य आणला होता. येथून परिसर खुप छान आणि येथे मन अगदी प्रस्सन होते, आणि जवळच परशुरामाचे मन्दिर आहे, परशुराम हा रेणुका देवीचा पुत्र आहे.
***** फन टाइम *******
देवीच्या मंदिर पाशी खुप सारे माकडे आहेत, तन्मय (माझा दीड वर्षाचा भाचा) माकडाबरोबर खुप खेळला, आम्ही पण तेथे खुप मज्जा केली.
आणि मग गुरुजीच्या घरी गेलो व जेवण केले व आम्ही परत नाशिकला निघालो.
आजपासुन ठरवलयं,
तुला कधीच नाही दुखवायचं,
वेड्या मनाला, पण सांगुन ठेवलयं,
की तु फ़क्त, मनातल्या - मनातच झुरायचं !
आजपासुन ठरवलयं,
तुला हसतानचं पहायचं,
आसवांनाही सांगुन ठेवलयं,
तुम्ही फ़क्त, डोळ्यातल्या - डोळ्यातचं वहायचं !!
आजपासुन ठरवलयं,
तुझंच बोलणं ऎकायचं,
वेडसर शब्दांनाही, सांगुन ठेवलयं,
तुम्ही सदा जिभेवरच रहायचं,
अन् ओठांवर कधीच नाही यायचं !!!...
on "Renuka" Mother of Shree Parasuram